✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
कृष्ण सावळा राधा गोरी,
प्रिती अनावर,
साधी भोळी...
तो विरळा अन् ती गोजिरी सुंदर,
नाही उलगडली,
प्रिती अनोखी..
ती समर्पित तोही भुकेला,
त्याचा नी तिचा,
भाव वेगळा...
ती अन् तो मुके नी अबोल,
देऊनी तन मन धन ,
झाले परिपूर्ण..
अद्वैताला या नाव न कुठले,
त्याचे नी तिचे ,
बंध युगांचे..
जगही सारे आजुनी मानते,
कृष्णच राधा,
राधाच कृष्ण...
No comments:
Post a Comment