जेंव्हा तुझी नी माझी,
पहिली भेट झाली,
झंकारली सतार अवचित,
उमलली कळी जराशी...
मी भाबडा मुका गं ,
तू उभी लाजूनी कोवळी,
सर येते पावसाची अखंड,
तुझ्या माझ्या अंतरात ही...
किती साजरा श्रृंगार तुझा,
भान हरले मन्मनी प्रिये,
तू साधीच त्या वेशात तरीही
मी शहारलो सखे अनुरागे...
जाहलो मुग्ध क्षणात प्रिये,
तू जाहली हरीणी अबोल...
मी थांबलो असा इथेच राणी,
नाही उरले भान क्षणक्षणांचे..
तूझा हात फिरे मुक्तकेशातुनी हा,
तारूण्य उतरले खुळ्या बटांतूनी ते..
सौंदर्य अवघे जणू चित्रवल्ली,
रेखिली चिर कुंकवाची ती सुंदर...
दे हात हाती सखे प्रेम अपुले,
जाहला सोहळा जखमी ह्रदयांतरीचा,
तुझी नी माझी कथा कोवळीही..
जन्म घेते ऋतू पावसाळी...
No comments:
Post a Comment